google.com, pub-1495071193253777, DIRECT, f08c47fec0942fa0 जरूरी जानकारी

No title

0

 

आता शक्तिमान होऊन दिसणार रणवीर सिंग, मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया कळली का?

fb (40)

हायलाइट्स:

  • शक्तिमान मालिकेवर सिनेमा होणार
  • शक्तिमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला ऑफर
  • मुकेश खन्ना करणार सिनेमाची निर्मिती
मुंबई- ९० च्या दशकात शक्तिमान या सुपरहिरोने बालचमूच नव्हे तर घरातील मोठ्यांवरही मोहिनी घातली होती. समाजातील अडल्यानडल्यांच्या मदतीला धावून जाणारा हा सुपरहिरो साकारला होता अभिनेते मुकेश खन्ना यांनी. तो लाल रंगाचा ड्रेस, छातीवर सूर्याची प्रतिमा असलेलं डिझाइन यामुळे शक्तिमानचा लुकही खूप प्रसिध्द झाला होता. आता साडेतीन दशकानंतर पुन्हा एक शक्तिमान अवतरणार आहे, पण तो मोठ्या पडद्यावर. काही दिवसांपूर्वी शक्तिमान या मालिकेवर आधारीत सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता लवकरच शक्तिमान हा सुपरहिरो मोठ्या पडद्यावर येण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी बॉलिवूड स्टार रणवीर सिंग याला शक्तिमान साकारण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची पक्की चर्चा आहे.
काही दिवसांपासून शक्तिमान सिनेमातून अवतरणार याबाबत चर्चा रंगली आहे. मुकेश खन्ना यांनी या भूमिकेला खूपच लोकप्रिय बनवले. आजही ३५ वर्षानंतर मुकेश खन्ना यांना शक्तिमान म्हणून ओळखले जातं. मुकेश यांच्या भीष्म इंटरनॅशनल या संस्थेतर्फेच या सिनेमाची निर्मिती करण्याची तयारी सुरू होती. पण शक्तिमान ही भूमिका साकारण्यासाठी कुणाला ऑफर द्यायची हे काही ठरत नव्हतं. पण आता रणवीर सिंगच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अजून रणवीरने या सिनेमासाठी होकार दिला नसला तरी त्याच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहोचला आहे.


शक्तिमान हे पात्र रणवीरनेही त्याच्या शालेय वयात पाहिलं आहे. त्यामुळे शक्तिमान या सुपरहिरोला सिनेमात साकारण्यासाठी त्याने रस दाखवला असल्याचं एका बातमीतून समोर आलं आहे. पण जोपर्यंत रणवीर हा सिनेमा साइन करत नाही तोपर्यंत अधिकृत घोषणा केली जाणार नाही असं मुकेश खन्ना यांनी सांगितलं आहे. आता रणवीरने शक्तिमानला होकार दिल्यानंतरच पुढच्या गोष्टी ठरणार आहेत. पण शक्तिमानच्या रूपात रणवीरला पडदयावर पाहण्यासाठी त्याच्या चाहते उत्सुक असतील हे नक्की. रणवीरच शक्तिमानच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं निर्मात्यांना वाटतय त्यामुळे रणवीरच्या निर्णयाकडे त्यांचे कान लागले आहेत.



रणवीरचा यापूर्वी जयेशभाई जोरदार हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. स्त्री भ्रूण हत्या करू नका हा संदेश असूनही त्याच्या या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही. तर सध्या रणवीर रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाचं शूटिंग करतोय. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट नायिकेच्या रूपात दिसेल. गली बॉय या सिनेमाही ही जोडी जमली होती. सर्कस या सिनेमाचं शूटिंगही त्यानं पूर्ण केलं आहे, ज्यामध्ये तो जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. सिंबा २ मध्येही रणवीरची वर्णी लागली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top